फ्रॅक्चर्ड फ्रिडम तुरुंगातील आठवणी आणि चिंतन लेखक : कोबाड गांधी अनुवाद : अनघा लेले पुस्तक हातात घेतल तेव्हा एक डून स्कूलचा विदयार्थी लंडन येथे शिकलेला नक्षलवादी चळवळीकडे का ओढला गेला असेल? सर्व सुखे हात जोडून समोर असताना ती झिडकारून या वाटेवर का चालतोय? या प्रश्नातूनच गरज नसताना तुरुंगात १० वर्ष काढावी लागली त्यामुळे तेथील हालअपेष्टा वाचायला मिळतील अशी अपेक्षा होती पण त्याही पेक्षा देशभरात चाललेली खदखद येथे वाचायला मिळते. CPI (माओवादी ) या संघटनेशी संबंधीत म्हणून वयाच्या ६२ व्या वर्षी अटक झाली. दिल्ली,तेलंगाणा,आंध्रप्रदेश,झारखंड,गुजरात अशा ५ राज्यातील ७ तुरुंगात कच्चा कैदी म्हणून वावरताना त्यांची संबंध आहे अनेक कैद्यांशी आली ...काही गुन्हेगार काही चळवळी. या काळात बराच वेळ मिळाला जो त्यांनी चिंतन व वाचनासाठी वापरला. देशातील न्यायव्यवस्था, पोलीस संरचना, राजकारणी, गुंड, टोळ्या या सर्वाचं तटस्थपणे वर्णन केलय.सामान्य तळागाळातील व्यक्ती हा पिचून गेलाय.त्या व्यवस्थेवर आपल्यालाही राग आल्यावाचून राहत नाही यावरील हे चिंतन आहे. सरकार मग कोणतेही'पक्ष'च असो हक्कासाठी लढणाऱ्या विरो...