फ्रॅक्चर्ड फ्रिडम
तुरुंगातील आठवणी आणि चिंतन
लेखक : कोबाड गांधी
अनुवाद : अनघा लेले
पुस्तक हातात घेतल तेव्हा एक डून स्कूलचा विदयार्थी लंडन येथे शिकलेला नक्षलवादी चळवळीकडे का ओढला गेला असेल? सर्व सुखे हात जोडून समोर असताना ती झिडकारून या वाटेवर का चालतोय?
या प्रश्नातूनच गरज नसताना तुरुंगात १० वर्ष काढावी लागली त्यामुळे तेथील हालअपेष्टा वाचायला मिळतील अशी अपेक्षा होती पण त्याही पेक्षा देशभरात चाललेली खदखद येथे वाचायला मिळते.
CPI (माओवादी ) या संघटनेशी संबंधीत म्हणून वयाच्या ६२ व्या वर्षी अटक झाली. दिल्ली,तेलंगाणा,आंध्रप्रदेश,झारखंड,गुजरात अशा ५ राज्यातील ७ तुरुंगात कच्चा कैदी म्हणून वावरताना त्यांची संबंध आहे अनेक कैद्यांशी आली ...काही गुन्हेगार काही चळवळी.
या काळात बराच वेळ मिळाला जो त्यांनी चिंतन व वाचनासाठी वापरला.
देशातील न्यायव्यवस्था, पोलीस संरचना, राजकारणी, गुंड, टोळ्या या सर्वाचं तटस्थपणे वर्णन केलय.सामान्य तळागाळातील व्यक्ती हा पिचून गेलाय.त्या व्यवस्थेवर आपल्यालाही राग आल्यावाचून राहत नाही
यावरील हे चिंतन आहे.
सरकार मग कोणतेही'पक्ष'च असो हक्कासाठी लढणाऱ्या विरोधात का असत?
त्याना विचारवतं शत्रू वाटतात का?
अन्याय व अत्याचाराविरोधात संघर्ष करण चुक आहेका?
लेखणीला का घाबरतात?देशाच्या चारही कोपऱ्यात असलेले गुन्हेगार देशाची खरी स्थिती सांगतात.
प्रत्येक राज्याची परिस्थिती वेगळी
झारखंड मधे कशाचा कोणाला कसलाच पत्ता नाही तर गुजरात मध्ये नक्षलवाद म्हणजे काय ? हेही माहित नाही.
त्यांचं तुरुंगातील जीवन हे अनुभव संपन्न करणारं होतं.अफजलगुरु आपल्या समोर एक व्हीलन म्हणून आहे पण त्याच्या सोबतचा संवाद बौद्धिकदृष्ट्या खूप खाद्य देणारा आहे.काश्मीरची समस्या दुसऱ्या बाजूने समजून घेता येते
त्यानीसाम्यवादाचा जो रस्ता पकडला त्यातील हार मान्य करून मर्यादा सांगितल्या आहेत
ताठर व यांत्रिकी विचाराने मार्क्सवाद मागे पडला कामगारांचे,गरिबांचे प्रश्न असा मार्क्सवादावरून प्रवास सुरू झाला पण त्यावरून पुढे जात •दलीत
• आदिवासी तसेच
•पितृसताक प्रश्नाचेही विश्लेषण केले आहे.
कारण जातीव्यवस्था हे भारताचे वास्तव आहे.त्यामुळे भारतात मार्क्सवाद रुजताना जातीवादाकडे दूर्लक्ष करूच शकत नाही. केवळ श्रेष्टत्वाच्या कल्पनेन विशिष्ट वर्गाच्या खाली पिचलेल्या लोकानी,लादलेल्या परिस्थितीचा चूपचाप स्विकार करू नये...!!!
भक्ती परंपरेच महत्व इथे अधोरेखीत होतं.
या सर्वाला छेद देणाऱ्या दोनच गोष्टी...
सत्ता आणि पैसा... !!!
हया एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. ह्या दोनही गोष्टी वाईट असल्या तरी आवश्यकही आहेत. पण दुसऱ्या बाजूला त्या भ्रष्ट ही करतात.
मग हा विरोधाभास कसा सोडवायचा? असेच देशाचे मूलभूत प्रश्न आणि त्यांची उत्तरे येथे सापडतात.
शेवटी ते सरकारला एक चपखल प्रश्न विचारतात,"आम्हाला सैतान म्हणवणारी आजची व्यवस्था देशातल्या लोकांच्या मूलभूत समस्या सोडवण्यात थोडीफार तर यशस्वी झाली आहे का ?"
व स्वतःच्या अधिकारासाठी आवाज उठवण्यास यासाठी त्यानां सतत प्रेरीत करत राहीले....!!! ज्या प्रश्नांचा आयुष्यभर पाटलाग केला त्यातील फोलपणा लक्षात आला.पण तो सर्व एक अनुभव होता हे स्पष्ट करतात.
त्याचबरोबर नवीन समाज रचनेचे गरजही सांगतात.नवीन आदर्श समाज रचना यायला हवी.
त्यात आनंद,स्वांतत्र्य आणि चांगली नितीमुल्ये यांची आर्थिक व्यवस्थेच्या वस्त्रात नक्षी बनायला हवी.
काही मुद्दे असहमत वाटले तरी अफजल गुरुशी झालेली चर्चा आणि आदिवासींचा प्रश्न समजून घेण्यासाठी तरी हा पुस्तक जरूर वाचा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा