मेहनत, जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास या बरोबरच यशस्वी आयुष्यासाठी उपयोगी असलेलं सर्वात महत्वाचं कौशल्य म्हणजे ‘संयम’. बऱ्याच जणांकडे ही आधी नमूद केलेली चार कौशल्य असतात, पण संयम मात्र नसतो. तर आजच्या भागात आपण बोलणार आहोत आपल्या आयुष्यात संयमाचं महत्त्व काय आहे. चला तर मग सुरुवात करूया! संयम म्हणजे फक्त वाट बघणं किंवा प्रतीक्षा करणं एवढंच नाही, तर ती प्रतीक्षा करत असताना आशावादी वृत्ती बाळगणं. एक छान मराठी सुभाषित आहे, ‘संयम म्हणजे काय? तर एक युद्ध… स्वतःच्या विरुद्ध...’ तुम्ही तुमच्या आयुष्यात कधी यशाचा आनंद घेतला आहे का? तो क्षण, त्यावेळच्या मनातील भावना खूपच महत्त्वाच्या असतात. नाही का? तसेच तुम्ही अनेकदा पराभवाची चवसुद्धा चाखली असेल. जगात सर्वत्र आणि सगळ्यांच्या बाबतीत हा यश-अपयशाचा खेळ चालूच असतो. जीवनात अपयश हाच खरा सोबती आहे. त्याचं स्वागत केलं पाहिजे. त्याच्यामुळे तर आपल्याला नम्रता, संयम आणि धैर्याचे धडे मिळतात. माणसाने नेहमी कठीण परिस्थितीतून वर येत जगलं की जिंकणं सोप्पं होतं. इतिहासाकडून आपण बऱ्याच गोष्टी शिकत असतो. त्यातील सर्वात...