मुख्य सामग्रीवर वगळा

संयम…! : यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेले अदृश्य कौशल्य

       मेहनत, जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास या बरोबरच यशस्वी आयुष्यासाठी उपयोगी असलेलं सर्वात महत्वाचं कौशल्य म्हणजे ‘संयम’. बऱ्याच जणांकडे ही आधी नमूद केलेली चार कौशल्य असतात, पण संयम मात्र नसतो. तर आजच्या भागात आपण बोलणार आहोत आपल्या आयुष्यात संयमाचं महत्त्व काय आहे. चला तर मग सुरुवात करूया!

      संयम म्हणजे फक्त वाट बघणं किंवा प्रतीक्षा करणं एवढंच नाही, तर ती प्रतीक्षा करत असताना आशावादी वृत्ती बाळगणं. एक छान मराठी सुभाषित आहे, ‘संयम म्हणजे काय? तर एक युद्ध… स्वतःच्या विरुद्ध...’


तुम्ही तुमच्या आयुष्यात कधी यशाचा आनंद घेतला आहे का? तो क्षण, त्यावेळच्या मनातील भावना खूपच महत्त्वाच्या असतात. नाही का? तसेच तुम्ही अनेकदा पराभवाची चवसुद्धा चाखली असेल. जगात सर्वत्र आणि सगळ्यांच्या बाबतीत हा यश-अपयशाचा खेळ चालूच असतो. जीवनात अपयश हाच खरा सोबती आहे. त्याचं स्वागत केलं पाहिजे. त्याच्यामुळे तर आपल्याला नम्रता, संयम आणि धैर्याचे धडे मिळतात. माणसाने नेहमी कठीण परिस्थितीतून वर येत जगलं की जिंकणं सोप्पं होतं.


इतिहासाकडून आपण बऱ्याच गोष्टी शिकत असतो. त्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे; ज्यांनी इतिहास घडवला, स्वतःचा नाव अजरामर केलं त्यापैकी कुणाचंही आयुष्य सुखासीन नव्हतं. बहुतेक सर्वांनाच काट्यांनी भरलेल्या रस्त्यावरून स्वत:ची वाट शोधावी लागली.


लष्करी प्रशिक्षण घेताना कॅरोली टकाक्सला भयंकर दुखापत झाली आणि त्याचा उजवा हात निकामी झाला. त्यामुळे तो नेमबाजी करू शकणार नव्हता, पण ही दुखापत त्याला त्याच्या ध्येयापासून विचलित करू शकली नाही. त्याने डाव्या हाताने सराव करायला सुरुवात केली. न थकता, न थांबता त्याचा सराव चालूच होता आणि एक दिवस असा उजाडला कि ऑलिम्पिकच्या इतिहासात कधीही न घडलेली घटना घडली ती आणि ती म्हणजे कॅरोली टकाक्स हा ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीच्या २५ मीटर रॅपिड फायर प्रकारात दोन सुवर्णपदकं मिळवणारा जगातील पहिला नेमबाज बनला.


बिल गेट्स हे सुद्धा असंच एक नाव आहे, ज्यांना सुरुवातीच्या काळात खडतर परिस्थितीला तोंड द्यावे लागले. तुमचा हे वाचून कदाचित विश्वास बसणार नाही, पण बिल गेट्स हॉवर्ड विद्यापीठातील ड्रॉपआउट आहेत. त्यांच्याकडे कोणतीही शैक्षणिक पदवी नाही, पण या गोष्टी त्यांच्या मार्गात कधीही अडसर बनल्या नाहीत. ते पुढे जात राहिले आणि आज ते जगातील सर्वात यशस्वी व्यक्तींपैकी एक आहेत. अशी कितीतरी उदाहरणे आपल्याला देता येतील.


मित्रांनो, एक लक्षात घ्या आपल्याला एखादी गोष्ट मिळाली नाही, याचा अर्थ सगळं संपलं असा होतो का? निश्‍चितच नाही. उलट आपण स्वतःला सिद्ध करण्यासाठी अजून थोडं झगडलं पाहिजे. स्वतःवर, स्वतःच्या प्रयत्नांवर विश्‍वास ठेवला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं, ‘संयम’ ठेवला पाहिजे. आयुष्यातला बहुतेक प्रश्‍नांचं उत्तर ‘वेळ’ देते. त्यामुळे आपल्याकडं कमालीचा संयम असणं खूप गरजेचं आहे.


मनुष्य जेव्हा संयम शक्ती वाढवतो, तेव्हा त्याची सगळी कामं सहज पूर्ण होतात. संयमाचं फळ केवळ मधुरच नाही, तर स्वास्थ्यवर्धकही असते. तुमचा संयम वाढला, की तुमची संकल्पशक्ती सुद्धा वाढत जाते. तुम्ही ध्येयाच्या अधिक जवळ जाऊ लागता. संयम नसेल, तर अनेकदा कामं पूर्ण होत नाहीत, अर्धवट राहतात. स्वप्न पूर्ण करण्यासाठी संयम बाळगला आणि योग्य दिशेने वाटचाल केली, तर नशीब तुमच्या मार्गात कधीही येणार नाही. परंतु अट एवढीच आहे की, लक्ष्य साध्य करताना पराजय स्वीकारू नये. म्हणजेच तुमच्या वाटेला कितीही पराजय आले तरी खचून जाऊ नका धैर्याने संयमाने पुढे चालत रहा एक दिवस तुम्हाला नक्कीच यश मिळेल.

      

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Sadik chavarekar

भगवे वादळ कांदे

नकार कसा पचवायचा ?

       नकार हा जीवनाचा एक भाग आहे. प्रत्येकाचा त्याच्या आयुष्यात कधीतरी नकाराचा सामना करावा लागतो. एखाद्या प्रकल्पासाठी तुम्ही अर्ज केला असेल आणि तुम्हाला नकार मिळाला असेल, एखाद्या व्यक्तीने तुम्हाला डेटवर नाकार दिला असेल, किंवा तुम्ही एखाद्या स्पर्धेसाठी प्रयत्न केले असतील आणि जिंकू शकले नाही. नकार हा निराशाजनक आणि त्रासदायक असू शकतो, परंतु त्यावर मात करणं आणि पुढे जाणं शक्य आहे. नकार स्वीकारण्यासाठी काही गोष्टी  *तुमच्या भावनांना अनुमती द्या :-         नकारामुळे दुःख, राग, निराशा आणि अपमान यासारख्या भावना येणं स्वाभाविक आहे. या भावना दडपून टाकू नका. त्यांना अनुभवा आणि त्यांचा सामना करा. रडणं, एखाद्या मित्राशी बोलणं किंवा तुमच्या भावना जर्नलमध्ये लिहिणं यासारख्या निरोगी मार्गांनी तुमच्या भावना व्यक्त करा. *कारण समजून घ्या :-         शक्य असल्यास, नकाराचं कारण समजून घेण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुम्हाला तुमची चूक सुधारण्यास आणि भविष्यात चांगली कामगिरी करण्यास मदत होईल. जर तुम्हाला नकाराचं कारण समजत नसेल, तर तुम्ह...

फ्रॅक्चर्ड फ्रिडम

  फ्रॅक्चर्ड फ्रिडम   तुरुंगातील आठवणी आणि चिंतन लेखक : कोबाड गांधी अनुवाद : अनघा लेले पुस्तक हातात घेतल तेव्हा एक डून स्कूलचा विदयार्थी लंडन येथे शिकलेला नक्षलवादी चळवळीकडे का ओढला गेला असेल? सर्व सुखे हात जोडून समोर असताना ती झिडकारून या वाटेवर का चालतोय? या प्रश्नातूनच गरज नसताना तुरुंगात १० वर्ष काढावी लागली त्यामुळे तेथील हालअपेष्टा वाचायला मिळतील अशी अपेक्षा होती पण त्याही पेक्षा देशभरात चाललेली खदखद येथे वाचायला मिळते. CPI (माओवादी ) या संघटनेशी संबंधीत म्हणून वयाच्या ६२ व्या वर्षी अटक झाली. दिल्ली,तेलंगाणा,आंध्रप्रदेश,झारखंड,गुजरात अशा ५ राज्यातील ७ तुरुंगात कच्चा कैदी म्हणून वावरताना त्यांची संबंध आहे अनेक कैद्यांशी आली ...काही गुन्हेगार काही चळवळी. या काळात बराच वेळ मिळाला जो त्यांनी चिंतन व वाचनासाठी वापरला. देशातील न्यायव्यवस्था, पोलीस संरचना, राजकारणी, गुंड, टोळ्या या सर्वाचं तटस्थपणे वर्णन केलय.सामान्य तळागाळातील व्यक्ती हा पिचून गेलाय.त्या व्यवस्थेवर आपल्यालाही राग आल्यावाचून राहत नाही यावरील हे चिंतन आहे. सरकार मग कोणतेही'पक्ष'च असो हक्कासाठी लढणाऱ्या विरो...