भारत हा उच्च उत्पन्न असलेल्या देशांपैकी एक बनला आहे. मात्र याचबरोबर उत्पन्न आणि संपत्तीमधील असमानतेतही मोठी वाढ होताना दिसत आहे. देशासाठी ही चिंतेची बाब आहे. युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम (UNDP) ने आपल्या एका अहवालात या गोष्टी नमूद केल्या आहेत. भारतातील दारिद्र्याखाली जगणाऱ्या लोकांची संख्या 2015-16 मधील 25 टक्क्यांवरून 2019-21 मध्ये 15 टक्क्यांपर्यंत घसरली आहे, असे या अहवालात सांगण्यात आले आहे.

युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रामने जाहीर केलेल्या अहवालानुसार, भारतातील सर्वात श्रीमंत 10 टक्के लोकांकडे देशाच्या निम्म्याहून अधिक संपत्ती आहे. तर 18.50 कोटी लोकांना गरिबीत जगावे लागत आहे. या लोकांचे उत्पन्न 180 रुपयांपेक्षा कमी आहे. आशियाचे यूएनडीपीचे प्रादेशिक संचालक कन्नी विघ्नराजा म्हणाले की, सध्याच्या आव्हानांवर मात करण्यासाठी आपल्याला मानवी विकासातील गुंतवणुकीला प्राधान्य देणे आवश्यक आहे. हे करण्यासाठी सर्व देशांना स्वतःचा मार्ग तयार करावा लागेल.
MSMEवेल्थक्रिप्टोकरन्सीबजेट
Marathi
बाजार
बातम्या
MSME
वेल्थ
क्रिप्टोकरन्सी
बजेट
UNDP Report : भारतातील 10 टक्के श्रीमंतांकडे अर्धी संपत्ती, उत्पन्न विषमता वाढतेय
Authored by Navnath Bhosale | The Economic Times Marathi | Updated: 8 Nov 2023, 12:54 pm
UNDP Report : युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रामने जाहीर केलेल्या अहवालानुसार, भारतातील सर्वात श्रीमंत 10 टक्के लोकांकडे देशाच्या निम्म्याहून अधिक संपत्ती आहे. उत्पन्न आणि संपत्तीमधील असमानतेतही मोठी वाढ होताना दिसत आहे.
मुंबई : भारत हा उच्च उत्पन्न असलेल्या देशांपैकी एक बनला आहे. मात्र याचबरोबर उत्पन्न आणि संपत्तीमधील असमानतेतही मोठी वाढ होताना दिसत आहे. देशासाठी ही चिंतेची बाब आहे. युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम (UNDP) ने आपल्या एका अहवालात या गोष्टी नमूद केल्या आहेत. भारतातील दारिद्र्याखाली जगणाऱ्या लोकांची संख्या 2015-16 मधील 25 टक्क्यांवरून 2019-21 मध्ये 15 टक्क्यांपर्यंत घसरली आहे, असे या अहवालात सांगण्यात आले आहे.
Income Tax Refund : कर परतावा मिळण्याची वाट पाहताय? कधी मिळणार ते 'असे' तपासा
युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रामने जाहीर केलेल्या अहवालानुसार, भारतातील सर्वात श्रीमंत 10 टक्के लोकांकडे देशाच्या निम्म्याहून अधिक संपत्ती आहे. तर 18.50 कोटी लोकांना गरिबीत जगावे लागत आहे. या लोकांचे उत्पन्न 180 रुपयांपेक्षा कमी आहे. आशियाचे यूएनडीपीचे प्रादेशिक संचालक कन्नी विघ्नराजा म्हणाले की, सध्याच्या आव्हानांवर मात करण्यासाठी आपल्याला मानवी विकासातील गुंतवणुकीला प्राधान्य देणे आवश्यक आहे. हे करण्यासाठी सर्व देशांना स्वतःचा मार्ग तयार करावा लागेल.
या आशिया-पॅसिफिक मानव विकास अहवालात दीर्घकालीन विकासाचे सकारात्मक चित्र सादर केले आहे. मात्र, उत्पन्न आणि संपत्तीमधील वाढत्या असमानतेबद्दलही चिंता व्यक्त करण्यात आली आहे. या दिशेने ठोस पावले उचलण्याचे या अहवालात आवाहन करण्यात आले आहे. भारतातील दरडोई उत्पन्न 2000 ते 2022 दरम्यान 442 डाॅलरवरून 2389 डाॅलरपर्यंत वाढले आहे. त्याच वेळी 2004 ते 2019 दरम्यान दारिद्र्यरेषा 40 टक्क्यांवरून 10 टक्क्यांवर आली आहे.
युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या अहवालानुसार, 2015-16 आणि 2019-21 दरम्यान दारिद्र्याखाली जगणारी लोकसंख्या 25 टक्क्यांवरून 15 टक्क्यांवर आली आहे. पण हे यश मिळूनही, देशातील 45 टक्के लोकसंख्या राहणाऱ्या राज्यांमध्ये गरिबी अजूनही खूप जास्त आहे. या राज्यांमध्ये एकूण 62 टक्के गरीब राहतात. अनेक लोक दारिद्र्यरेषेच्या अगदी वर आहेत. असे लोक पुन्हा दारिद्र्यरेषेखाली जाण्याचा धोका आहे. यामध्ये महिला, असंघटित क्षेत्रातील कामगार, आंतरराज्य स्थलांतरितांचा समावेश आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा